मुंबई : सावित्रीबाई फुले मनपा रुग्णालयात ४ नवजात बालकांचा झालेला मृत्यू आणि बुधवारी विधिमंडळात अंगविक्षेप करून पंतप्रधानांचा अपमान करणारे आमदार भास्कर जाधव यांच्या फोटोला बांगड्या घालून भाजपतर्फे दादर येथे निषेध करण्यात आला. यावेळी तिघाडी सरकारचा निषेध देखील करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी दुःख व्यक्त करत भास्कर जाधव यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यातील पदाधिकारी लाल साहेब सिंग, संदीप धाम, विलास आंबेकर, मणी बालन, राहुल वाळुंज, विजय पगारे, विजय डगरे, संतोष गुप्ता, निलेश नायकर, कौशिक कनाडीया, अजित सिंग, पुष्पा आडारकर, बिंदू यादव, रवी रांगणेकर, संजय दास्ताने हे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार तामिळ सेलवन उपस्थित होते.