मुंबई : कृणाल म्युझिकने आजवर विविध प्रकारची गाणी तयार करून ती यशस्वीरीत्या रसिकांपर्यंत पोहचवली आणि रसिकांनीही त्याचे जोरदार स्वागत केले आहे. लग्नसराईच्या हंगामात बहारदार लग्नगीतांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना नेहमीच मिळत असते. येत्या हंगामासाठी हीच मेजवानी रसिकांना देण्यासाठी कृणाल म्युझिक दोन नवीन लग्नगीते घेऊन येत आहेत. ‘वडाला फुटलाय पान’ आणि ‘माझे नावाचा शालू लग्नात घालशील काय’ ही दोन धमाल गीते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
गायक अनिमेष ठाकूर आणि साक्षी चौहान यांच्या आवाजातील ‘वडाला फुटलाय पान’ हे गीत राज ईरमाली यांनी लिहिले असून डिजे गणेश यांनी संगीत संयोजन केले आहे. पारंपरिक बाजातील हे धम्माल लग्नगीत रसिकांना नक्की ताल धरायला लावणार आहे. दुसरं श्रवणीय गीत ‘माझे नावाचा शालू लग्नात घालशील काय’ हे लवकरच व्हिडिओरुपात कृणाल म्युझिक वर येत आहे. साहिल मोरे लिखित या गाण्याला चंद्रजीत कांबळे यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच स्वर विवेक नायर यांचे आहेत. नुकतेच या गीताचे चित्रीकरण पार पडले असून ते रसिकांना कृणाल म्युझिकवर लवकरच पहायला मिळणार आहे.
अल्ट्रा मीडिया अँड एन्टरटेन्मेंट ग्रुपचे सीईओ श्री. सुशिलकुमार अग्रवाल म्हणाले की, ‘अल्ट्रा नेहमीच नवीन प्रतिभावान कलाकारांबरोबर काम करत विविध सांगितीक प्रकारांना प्रोत्साहन देण्याच्या संधी शोधत असते. रसिकांच्या आवडीनिवडी जोपासत निर्मिती करण्याकडे कायम आमचा कल असतो. ही दोन्ही गीते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…