कर्जत : कर्जत नगरपरिषद हद्दीतील सिमेंट क्रॉक्रिटच्या रस्त्यांवरील पडलेला कचरा उचलण्यासाठी सन २०१९ मध्ये तब्बल ४७ लाख ३७ हजार रुपये खर्च करून स्विपर ट्रकची खरेदी करण्यात आली. मात्र ती खरेदी करताना कर्जत शहरातील रस्त्यांसाठी तो ट्रक किती प्रभावी ठरेल. तसेच ट्रक चालवण्यासाठी डिझेल आणि प्रशिक्षित वाहन चालकावर किती खर्च येईल, याचा ठोकताळा न घेतल्याने आजच्या घडीला हा स्विपर ट्रक नगर परिषदेसाठी पांढरा हत्ती ठरला आहे, असा कर्जतकर करत आहेत.
स्विपर ट्रक चालवण्यासाठी विशेष प्रशिक्षित वाहन चालकाची गरज भासते. तसा चालक कर्जत नगरपरिषदेकडे सध्या उपलब्ध नाही. तसेच, आठवड्यातील फक्त तीन दिवस शहरात गाडी फिरवायची म्हटली तरी तब्बल १८ हजारांचे डिझेल लागते. खेदाची बाब म्हणजे एवढा खर्च करूनही या गाडीने कचरा उचललाच जात नाही, हे विदारक सत्य आहे. त्यामुळे ही गाडी नगर परिषदेने खरेदी केल्यापासून कित्येक महिने एकाच जागेवर धूळखात उभी असल्याचे नागरिकांना दिसून येते. त्यामुळे कर्जत नगरपरिषदेने जनतेच्या पैशांतून स्विपर ट्रक खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय नक्कीच फायदेशीर ठरला नाही, असा आरोप नागरिक करत असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
एकीकडे दररोज कचरा उचलणाऱ्या घंटा गाड्यांची अवस्था फारशी चांगली नसून काही गाड्यांना तर धक्का मारायची वेळ कर्मचाऱ्यांवर येते. त्यामुळे खरे तर कर्जत नगरपरिषदेने नवीन स्विपर ट्रक खरेदी करण्यासाठी घातलेला घाट कितपत योग्य होता, असा सवाल नागरिकांमधून होत आहे.
मुळातच शहरातील काही प्रभागांमधील रस्ते अरुंद आहेत. तेथे हा स्विपर ट्रक मोठा असल्याने अंर्तगत रस्त्यांमध्ये घुसतसुद्धा नाही. तसेच, हा स्विपर ट्रक चालवण्याचे चालकाला प्रशिक्षण नसल्याने रस्त्यावरील कचरा साफ करण्याऐवजी गोल फिरणाऱ्या ब्रशचा रस्त्यावर जास्त दबाव पडत असल्याने रस्त्यालाच बाधा पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे नगरपरिषदेने ही गाडी खरेदी करून नक्की काय साध्य केले, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
नगर परिषदेने स्विपर ट्रक खरेदीचा घाईगडबडीत घेतलेला निर्णय चुकीचा असून या गाडीचा रस्ते साफसफाईसाठी अपेक्षित उपयोगच होत नाही. त्यामुळे हा निधी व्यर्थ गेला असून अन्य कामांसाठी खर्च केलेला परवडला असता. – अमोघ कुलकर्णी, आरटीआय कार्यकर्ता
कर्जत नगरपरिषदेने दैनंदिन रस्त्यांवरील कचरा उचलण्यासाठी स्वयंचलित मशिनरी आणताना त्याबाबतची शहनिशा तथा परिपूर्ण माहिती घ्यायला पाहिजे होती. आता या स्विपर ट्रकचा काहीच उपयोग होत नसून हा ट्रक म्हणजे शोभेची वस्तू ठरला आहे . – राजेश लाड, माजी नगराध्यक्ष कर्जत न. प.
स्विपर ट्रक खरेदी करताना आम्हा नगरसेवकांना विचारात घेतले नव्हते. या गाडीचा उपयोग होत नसल्याने जनतेचा पैशाचा अपव्यय झाला आहे. – उमेश गायकवाड, नगरसेवक, कर्जत न. प.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…