चाहत्यांच्या लग्नात पोहोचले 'ओम आणि स्वीटू'

मुंबई : झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आणि लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेतील प्रमुख जोडी ओम आणि स्वीटू हि तर प्रेक्षकांची आवडती आहे. या दोघांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. या दोघांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. मालिकेत नुकतंच ओम आणि स्वीटू यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. अखेर ओम आणि स्वीटू एकत्र आले आणि याचा आनंद प्रेक्षक आणि चाहत्यांना देखील झाला. हा आनंद एका अनोख्या पद्धतीने ओम आणि स्वीटू यांनी आपल्या चाहत्यांसोबत साजरा केला.


ओम आणि स्वीटू यांनी १९ डिसेंबर रोजी ज्या जोडप्यांची लग्न आहेत त्यांना त्यांची विवाह पत्रिका सोशल मीडियावर पाठवायचं आवाहन केलं आणि त्यातील एका जोडीच्या लग्नात उपस्थिती दर्शवण्याचं प्रॉमिस केलं आणि त्यांनी केलेल्या प्रॉमिस प्रमाणेच सौरभ आणि जुही यांच्या लग्नात ओम आणि स्वीटू यांनी हजेरी लावली आणि या नवदाम्पत्याला त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना आपल्या लग्नात पाहून या जोडप्याला सुखद धक्काच बसला आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. चाहते आणि कलाकार यांच्यातील नातं अजून घट्ट करण्याचा ओम आणि स्वीटू यांचा हा प्रयत्न नक्कीच उल्लेखनीय होता असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.

Comments
Add Comment

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक