Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीदोडामार्ग तालुका निर्मिती केली; शहराचा कायापालटही आम्हीच करू

दोडामार्ग तालुका निर्मिती केली; शहराचा कायापालटही आम्हीच करू

नारायण राणे यांचे आश्वासन

दोडामार्ग (प्रतिनिधी):दोडामार्ग तालुक्यातील जी प्रलंबित विकास कामे आहेत ती मार्गी लावण्यासाठी आपण केंद्राकडून भरघोस निधी देऊ. तालुका निर्मिती बरोबरच कार्यालयेही केली. शहराचा कायापालटही आम्हीच करू. रोजगारासाठी आडाळी एमआयडीसी आणली त्याठिकाणी आयुर्वेदिक संशोधन केंद्राला मंजुरी घेतली. एमआयडीसीपासून अवघ्या अंतरावरच मोपा विमानतळ होत आहे. त्यामुळे येथे उद्योगांना वाव मिळणार आहे. एकदा का उद्योगधंदे सुरू झाले तर, भविष्यात दोडामार्ग शहर विकसित होऊन कायापालट होणार आहे. हे आम्ही करून दाखवू. शहरातील जनता यापूर्वी माझ्या पाठीशी राहिली आहे. मला खात्री आहे. दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये भाजपचीच सत्ता बसविण्यासाठी जनता कौल देईल हे निश्चित आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही भाजपच विजयी होणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोडामार्ग येथे बोलताना व्यक्त केला.

दोडामार्ग शहरातील भाजप उमेदवार व पदाधिकारी यांच्याशी त्यांनी महालक्ष्मी हॉल मध्ये संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, तालुका अध्यक्ष प्रवीण गवस, शहराध्यक्ष पांडुरंग बोर्डेकर, मंदार कल्याणकर, आरपीआय जिल्हाध्यक्ष रमाकांत जाधव, चेतन चव्हाण, संतोष नानचे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदशन करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, नवीन उमेदवार यांनी काम करताना सर्वसामान्य जनतेला अभिप्रेत काम केले पाहिजे. त्यांच्याशी सौजन्याने वागले पाहिजे. शहरातील नागरी सुविधा देण्यासाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करा. भाजपच्या वतीने रस्ते पाणी वीज आदींसह वाचनालयही उभी करण्यात येतील. शहराच्या विकासासाठी निधी दिला जाईल असे आश्वासन राणे यांनी दिले. यावेळी त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना निवडून आणण्याचे आवाहन केले .

तर जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की, माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर हे निवडणूक आली की वेगवेगळ्या घोषणा करतात. पण त्या पूर्ण करत नाहीत. आता नगरपंचायत निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यावेळी एकनाथ नाडकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर आभार राजेंद्र म्हापसेकर यांनी मानले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -