जैतापूर प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल

मुंबई (प्रतिनिधी) : फ्रांसच्या सहकार्याने होत असलेला जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प असून या प्रकल्पामुळे भारतीय व फ्रेंच उद्योगांमधील सहकार्य अधिक वाढेल, असे प्रतिपादन फ्रांसचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी येथे केले.

शॉर्ले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोमवारी राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
सन २०२२ साली फ्रांस भारतात आपला सांस्कृतिक महोत्सव 'बॉनजो इंडिया' आयोजित करणार असून त्यानंतर भारत देखील फ्रांस मध्ये 'नमस्ते फ्रांस' या भारताच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना काळात भारतातील फ्रेंच कंपन्यांनी एकही कामगार कपात केली नाही असे वाणिज्यदूतांनी राज्यपालांना सांगितले.
राफाएल सहकार्यामुळे भारत - फ्रांस संबंध अधिक मजबूत झाले असून फ्रेंच कंपनी दासाऊँ एव्हिएशनच्या सहकार्याने नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरु असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून