मराठवाडा-विदर्भ गारठला; तापमानात मोठी घट

परभणी : मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गारठा वाढला आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात ढगाळ वातावरणामुळे थंडी काहीशी गायब झाली होती. मात्र, मागील चार दिवसापासून तापमानात मोठी घट होत असल्याने गारठा वाढला आहे.


आज परभणीत ९.५ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या थंडीचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. रब्बी पिकांमध्ये प्रामुख्याने हरभरा, गहू आणि तूर या पिकांना या थंडीचा फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.


तर दुसरीकडे वाढलेल्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये कमालीची घट दिसून येत आहे. अनेक ठिकांनी शेकोट्या पेटलेल्या आहेत. एकूणच या गुलाबी थंडीचा आनंद परभणीकर घेत आहेत.


पुढील काही दिवस असाच गारठा कायम राहण्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे येणारे काही दिवस परभणीकरांना या बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागणार, हे मात्र निश्चित.


विदर्भ हा सर्वाधिक तापमानाचा प्रदेश आहे. नागपूर आणि चंद्रपूरात सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. उन्हाळ्यात चंद्रपूरचे तापमान सरासरी ४५ डिग्री असते. तर आता ४९ डिग्री तापमानाची नोंद चंद्रपूरात झालेली आहे. सर्वाधिक तापमान झेलणाऱ्या जिल्ह्यातील जनता आता मात्र गुलाबी थंडीने गारठली आहे. मागील काही दिवसांपासून तापमान घसरल्याने थंडीचा जोर वाढला आहे. भरदिवसा शेकोटीचा आसरा नागरिकांना घ्यावा लागत आहे.

Comments
Add Comment

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी