'श्यामची आई''साठी राज्य पातळीवर सुजय घेतोय श्यामचा शोध...

मुंबई :  काही गोष्टी, तसंच साहित्य हे जणू सोनेरी आठवणींचा ठेवाच असतं. ''श्यामची आई'' ही कथाही यांपैकीच एक आहे. त्यामुळं जेव्हा कधी ''श्यामची आई''चा उल्लेख होतो, तेव्हा क्षणार्धात श्याम आणि त्याच्या आईची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी रहाते. ''शाळा''सारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत दाखल झाल्यानंतर नेहमीच नावीन्यपूर्ण प्रयोग करत मराठी रसिकांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येणारा दिग्दर्शक सुजय डहाकेनं आता ''श्यामची आई'' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचलल्याचं सर्वांनाच माहित आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या याचीच पूर्वतयारी सुरू असून, सुजय सध्या श्यामचा शोध घेण्यात बिझी आहे.

अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेल्या ''श्यामची आई''साठी श्यामचा शोध घेण्यासाठी सुजयनं एक शोध मोहिम सुरू केली आहे. श्यामची भूमिका साकारू शकेल अशा कलाकाराचा महाराष्ट्र राज्य पातळीवर शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. यासाठी एक प्रसिद्धी पत्रकही प्रकाशित करण्यात आलं असून, ''श्यामची आई'' चित्रपटात टायटल रोल साकारण्यासाठी अभिनयाची आवड असलेल्या ८ ते १२ वर्षे वयोगटातील बालकलाकाराची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यास उत्सुक असणाऱ्या मुलांच्या पालकांनी संपर्क साधण्याचं आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. रुपेरी पडद्यावर श्याम साकारण्यास इच्छुक असलेला मुलगा ८ ते १२ वर्षे वयोगटातील असावा. त्याने स्वतःच एखादा मोनोलॉग मोबाईलवर रेकॉर्ड करून दिलेल्या फोन नंबर आणि ईमेलवर पाठवावा. कोणीही थेट फोन करू नये. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर २०२१ आहे. या तारखेनंतर फोन आणि ईमेल बंद करण्यात येतील. यातून एकूण १० मुलांची निवड केली जाईल. त्यांना मुंबईत आणून, तीन दिवसांची अभिनय कार्यशाळा घेतली जाईल. त्यातून एका मुलाची निवड श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड केली जाईल. निवड झालेल्या मुलांना सुजय आणि त्याच्या टीमकडून संपर्क साधला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. इच्छुक मुलं व पालकांनी shyamchiaai2022@gmail.com आणि ८७७९६२४८२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

''शाळा'', ''फुंतरू'', ''आजोबा'', ''केसरी'' असे एका पेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणाऱ्या सुजयनं भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत सुजयनं १५ ऑगस्ट रोजी पोस्टर रिलीजच्या माध्यमातून ''श्यामची आई'' या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ''श्यामची आई'' हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित असेल. यंदाचं वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या १५०व्या जयंतीचं आहे. अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेला ''श्यामची आई'' हा चित्रपट पुढल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. या चित्रपटाचं शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

शिक्षकांकडून अमानुष वागणूक; लहानग्याच्या छळाप्रकरणी पोलिसांची कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एका शाळेत सहा वर्षांच्या चिमुकल्याला शिक्षकांकडून अमानुष वागणूक

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

खोटा बनाव रचत, मुलीच्या आजाराला कंटाळून जन्मदात्या आईनेच घेतला ६ वर्षांच्या मुलीचा जीव

पनवेल : आई आणि तीच मूल मग मुलगा असो वा मुलगी यांच्या नात्याची दुसऱ्या कोणत्याही नात्याशी तुलना करता येत नाही. आपलं

धुरंधरलाही या चित्रपटाने टाकलं मागे, पहिल्याच आठवड्यात कमवले १०० कोटी

भारतात पहिल्यांदाच या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात रचला इतिहास सध्या सगळीकडेच धुरंधर हा चित्रपट फेमस झाला

Shilpa Shetty...शिल्पा शेट्टी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय, AI मॉर्फ कंटेंटवर बंदी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा गैरवापर सर्रासपणे केला जातो. मागील काही दिवसात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे देखील