रविवारी सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई,: मध्य रेल्वे दि. १९.१२.२०२१ रोजी देखभालीचे काम करण्यासाठी हार्बर मार्गावर खालीलप्रमाणे मेगाब्लॉक करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि

चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.



ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

मेन लाईनवर दि. १९.१२.२०२१ रोजी दिवा आणि ठाणे दरम्यान ५व्या आणि ६व्या रेल्वेमार्ग कामाच्या संदर्भात एक पायाभूत सुविधा ब्लॉक  केला जाणार आहे.



हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Comments
Add Comment

महापालिकेत पहिले पक्ष कार्यालय मिळवण्यात भाजपने मारली बाजी

शुक्रवारी विधीवत पुजा करून करणार प्रवेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत नगरसेवक निवडून आल्यानंतर

उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या बदल्या आणि बढती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सहायक आयुक्त विनायक विसपुते यांना उपायुक्त पदी बढती देण्यात

कचऱ्याच्या जुन्या आणि खराब वाहनांना रस्त्यांवर नो एंट्री

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात असलेली कचऱ्याची वाहने आता

'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करा - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबईत २७ व २८ मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्स' चे आयोजन मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला

Dombilvli: डोंबिवलीत शॉरमावालीच्या स्टॉलवर राज ठाकरेंचा फोटो, अविनाश जाधवांनी दिलेला शब्द पाळला

डोंबिवली: मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एकता सावंत या मराठी व्यावसायिका

एका खटक्यात दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसर साफ

चोरबाजारासह अनधिकृत फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांवर कारवाई मुंबई :  दादर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील जागेत मागील