बुर्ज खलिफावर झळकला मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे

मुंबई : अभिनेता आदिनाथ ठोकारे म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील स्टार अभिनेता. आदिनाथ आपल्या सिनेमांमुळे कायम चर्चेत असतो आणि 


सध्या आदिनाथ चर्चेत आहे तो बुर्ज खलिफावर झळकल्यामुळे.. 83 सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता आदिनाथ कोठारे दुबईच्या बुर्ज खलिफावर झळकला. बुर्ज खलिफावर स्थान मिळालेला आदिनाथ हा पहिला मराठी कलाकार असल्याचं बोललं जातंय. 


कबीर खान दिग्दर्शित ‘83’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमामध्ये आदिनाथ पूर्व भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 



 


हा सिनेमा १९८३ मध्ये रंगलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप आधारित आहे. या मॅचमध्ये भारताने वेस्ट इंडिजला हरवून वर्ल्ड कप आपल्या नावावर केला होता. या इतिहासिक विजयावर हा सिनेमा आधारित असून या सिनेमात रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे तर दीपिका पदुकोणने कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. 


तर या सिनेमात आदिनाथ दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.  या महत्वपूर्ण सिनेमात काम करायला मिळाल्यामुळे आदिनाथ खूष आहे आणि आता तर बुर्ज खलिफावर झळकल्यामुळे त्याच्या आनंदात अधिकच भर पडली आहे.  





Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी