शीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीने पत्रातून केला धक्कादायक दावा

मुंबई : देशात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडात (Sheena Bora Case) आईनेच आपल्या मुलीचा निर्घून खून केला होता. या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या धक्कादायक घटना समोर आल्या असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने (Indrani Mukherjee) वेळोवेळी आपला जबाब बदलला आहे. त्यातच इंद्राणी मुखर्जीने आता शीना बोरा जिवंत असल्याचा धक्कादायक दावा केला असल्यामुळे सगळेच जण चक्रावले आहेत.


२०१२ साली झालेल्या या घटनेत इंद्राणी मुखर्जीने आपली मुलगी शीना बोरा हीचा खून केल्याचं समोर आलं होतं. मात्र आता इंद्राणी मुखर्जीने सीबीआयच्या संचालकांना पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचं म्हटलं आहे. या पत्रात तिने लिहिले आहे की, "काही दिवसांपूर्वीच तुरुंगात भेटलेल्या एका महिलेने आपल्याला सांगितलं की, तिला काश्मीरमध्ये शीना बोरा भेटली होती." त्यामुळे तिने सीबीआयला काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घेण्याचं आवाहन केलं आहे. या पत्राव्यतिरिक्त, शीना बोराने विशेष सीबीआय न्यायालयासमोर एक अर्ज देखील दाखल केला आहे. यावर देखील लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, शीना बोरा हत्याकांडप्रकरणी इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक झाल्यापासून मुंबईतील भायखळा तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तिचा जामीन अर्ज गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता. इंद्राणी मुखर्जी लवकरच वकील सना खान यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

ब्रँड विरुद्ध ब्रँडी: फडणवीस-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राजकारण तापले!

मुंबई: बेस्ट (BEST) निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 'ब्रँड' विरुद्ध 'ब्रँडी' असा नवा वाद सुरू झाला आहे.

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र