दिल्लीत पुन्हा ‘ओमायक्रॉन’चे चार रुग्ण सापडले

नवी दिल्ली : देशात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण होण्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूचे ओमायक्रॉन हे धोकादायक रूप आता ११ राज्यांमध्ये पसरले आहे. बुधवारी ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण केरळमध्ये चार, महाराष्ट्रात चार, तेलंगणात दोन आणि पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण १२ रुग्णांची एका दिवसात पुष्टी झाली आहे. त्याचवेळी दिल्लीत आज आणखी चार रुग्ण आढळले आहेत. यासह, देशातील एकूण संक्रमित लोकांची संख्या ७७ वर पोहोचली आहे.


दिल्लीत ओमिक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या १० झाली आहे. या १० रुग्णांपैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून नऊजण अजूनही एलएनजेपी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.


दरम्यान, महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक आतापर्यंत एकूण ३२ रुग्ण आढळून आले आहेत. राजस्थान १७ रुग्णांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय गुजरात (४), कर्नाटक (३), केरळ (५), आंध्र प्रदेश (१), तेलंगणा (२), पश्चिम बंगाल (१), चंदीगड (१), तामिळनाडू (१) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले