वेस्ट इंडिजच्या तीन खेळाडू व दोन साहाय्यक प्रशिक्षकांना कोरोना

नवी दिल्ली  : पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातील पाच सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन खेळाडू व दोन साहाय्यक प्रशिक्षकांचा समावेश आहे. संघातील यष्टिरक्षक-फलंदाज शाय होप, फिरकीपटू अकिल होसैन, अष्टपैलू जस्टीन ग्रिव्हेस या खेळाडूंना लागण झाली आहे. तर, साहाय्यक प्रशिक्षक रोड्डी इस्टविच व संघाचे फिजिशियन डॉ. अक्षाई मानसिंग यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. वेस्ट इंडिजच्या संघातील तीन खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते मालिकेला मुकणार आहे. सध्या या सर्वांना विलगिकरणात ठेवले जाणार आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या या पाचही जणांना वेस्ट इंडिजच्या अन्य सदस्यांपासून दूर ठेवण्यात येणार आहे. त्याची विशेष काळजी घेतली जात असून त्यांच्या देखरेखीसाठी वैद्यकिय टीम आहे. पुढील १० दिवस ते विलगिकरणात राहतील. या सर्वांचा पीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच हा कालावधी संपेल, अशी माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाकडून देण्यात आली.
Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व