भिवंडीत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यासाठी जनजागृती

भिवंडी (वार्ताहर) : टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या हेतूने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक कर्मचाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत मनपा आरोग्य विभागाचे उपायुक्त दिपक झिंझाड यांच्या मार्गदर्शनाखाली वेताळ पाडा व संभाजी चौक येथे नगरसेवक अरुण राऊत आणि अभिषेक राउत यांच्या उपस्थितीत नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत, तसेच ओला कचरा व भाजीपाल्याचा कचरा, जेवणाचा खरकटा, फळांच्या साली, कागद-प्लास्टिक भंगारवाल्यांना विकण्याबाबत त्याचप्रमाणे सिंगल युस प्लास्टिक बंदी, कापडी पिशवीचा वापर, ओल्या कचऱ्यापासून शहरातील आरीफ गार्डन येथील खत निर्मूलन केंद्रात खत बनवणे अशा प्रकारे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.



यावेळी सहाय्यक आयुक्त दिलीप खाणे, प्रभाग आरोग्य निरीक्षक एम. पी.विशे, आरोग्य निरीक्षक दिपक धनगर, महेश दुसा, दिगंबर जाधव, मुकेश सुर्वे, महेश सोनवणे आदी कर्मचारी उपस्थित होते





Comments
Add Comment

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त