Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीवनडे मालिकेत खेळणार, विराट कोहलीचे स्पष्टीकरण

वनडे मालिकेत खेळणार, विराट कोहलीचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी उपलब्ध होतो आणि आहे. तुम्ही हा प्रश्न विचारायलाच नको, असे स्पष्टीकरण भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने दिले आहे. मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहेच. तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारायला हवेत, जे यासंदर्भात चुकीच्या गोष्टी लिहीत आहेत. माझं म्हणाल तर मी सिलेक्शनसाठी उपलब्ध आहे. मी नेहमीच खेळण्यासाठी इच्छुक असतो, असे कोहली म्हणाला…..

टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर विराट कोहली या प्रकारातील संघाच्या कर्णधारपदावरून स्वत:हून पायउतार झाला. त्यावेळी त्याला वनडे कर्णधारपदही सोडावे लागेल, अशी चर्चा सुरू झाली होती. तसेच घडलेही. न्यूझीलंड दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करताना बीसीसीआयने वनडे संघाचे कर्णधारपद देखील रोहित शर्माकडे दिले. त्यामुळे विराट कोहली दुखावल्याची चर्चा सुरू झाली…..

त्यातच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेमधून वैयक्तिक कारणासाठी विराट कोहलीने बीसीआयकडे विचारणा केल्याचे प्रसिद्ध झाले. रोहित शर्मासोबत वाद असल्यामुळेच विराट कोहलीनं एकदिवसीय मालिकेतून माघार घेतल्याचे देखील बोलले जात होतं. त्यासंदर्भात अखेर विराट कोहलीने मौन सोडले…..

खेळापेक्षा कुणी मोठा नाही : अनुराग ठाकूर

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादावर भाष्य करताना, खेळापेक्षा कोणी मोठं नाही असे सांगताना केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी संबंधित फेडरेशन, संस्थांनी यासंबंधी अधिक माहिती दिली पाहिजे असे म्हटले आहे.

खेळ सर्वोच्च असून कोणीही खेळापेक्षा मोठं नाही. कोणत्या खेळात कोणत्या खेळाडूंमध्ये काय सुरु आहे ही माहिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. हे काम त्या संबंधित फेडरेशन, संस्थांचं आहे. त्यांनीच माहिती दिली तर हे बरं होईल, असं अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. काही आठवड्यांपूर्वीच भारताच्या वनडे संघाचे कर्णधारपद कोहलीकडून काढून मुंबईकर रोहितकडे सोपवण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -