पहिल्या दिवशी ठाणे महापौरांकडून गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

ठाणे : राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड- १९ व ओमिक्रॉन विषाणू नियंत्रण नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत शहरातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या किसननगर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले.

आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून पहिल्या दिवसाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, वागळे प्रभाग समिती अध्यक्षा सौ.एकता भोईर, नगरसेविका संध्या मोरे, जेष्ठ नगरसेवक राम रेपाळे, प्रकाश शिंदे, सुधीर कोकाटे, उप आयुक्त मनीष जोशी, गटअधिकारी संगीता बामणे आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गुलाबपुष्प देवून त्यांचे स्वागत केले. तसेच कोव्हिडच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेवून त्यांनी डिजीटल क्लास रूमला भेट दिली.

सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने टप्याटप्याने सर्व शाळा सुरू होत आहेत. कोव्हिड 19 तसेच ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग टाळून शहरातील विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेत आज पासून पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

ठाणे महापालिकेचे प्राथमिक शाळेचे वर्ग सुरु करताना शाळेची संपूर्ण स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच शिक्षकांचे प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यासोबतच सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था प्रत्येक शाळेत करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम