बिग बॉस मराठी: 'टीम B' मधील मतभेद काही संपायचं नावं घेईना !

मुंबई  : बिग बॉस मराठी सिझन तिसरा आता अंतिम टप्प्यावर आला असला तरीदेखील सदस्यांचे रूसवे - फुगवे, भांडण, मतभेद, द्वेष काही संपायचे नावं घेत नाहीयेत. टीम B मध्ये आता बहुमत असले तरीदेखील त्यांच्यातील मतभेद सुध्दा तितकेच वाढल्याचे दिसून येते. कोणालाच कोणाचं मतं पटतं नाहीये असं वाटतं आहे. कालपसून विकास आणि मीनलमध्ये वादाची ठिणगी पडली आणि जोरदार राड्याला सुरुवात झाली. हे सदस्य टास्कमध्ये झालेल्या गोष्टी घरात घेऊन येतात. त्यामुळे हा गुंता अधिकच वाढतो. आज एकीकडे विशाल – विकास तर दुसरीकडे मीनल – सोनाली चर्चा करताना दिसणार आहेत. इथेच हे थांबले नसून पुन्हा चौघजण एकत्र सकाळी चर्चा करताना देखील दिसून येणार आहेत.


विशाल विकासशी बोलताना दिसणार आहे, तू आता हे बोलतो आहेस, तू माझ्या ठिकाणी असतास तर हे बोलला नसतास, मी सांगतो ना. विकास म्हणाला, मी बोललो असतो. मी चुकीचा आहे ठरवतो आहेस तू. मला हे म्हणायचे आहे सोनाली किंवा इतर चिडत का नाही मला माहिती नाही, पण त्या एका गुणाचं का महत्व आहे ते मला माहिती आहे. त्या लोकांना माहिती नाहीये. विशाल म्हणाला, मी तुला हेच सांगायचं आहे, टीम A  म्हणजे फक्त ती लोकं नाही तुदेखील आहेस त्यात... तू तुझ्या ठिकाणी बरोबर स्टँड घेतला आहेस. दुसरीकडे, मीनल सोनालीला सांगताना दिसणार आहे, तो जो टास्क आहे ना हॅप्पी बर्थडे...  तो तुझ्यामुळे तिथपर्यंत तरी पोहचला. नाहीतर काहीच झालं नसतं. विकास पाटील काहीच व्यवस्थित खेळत नव्हता. कोणती आयडिया आहे जी त्याने लावली. तुमचीच होती आयडिया. प्लेअर म्हणून तो खूप चुकला आहे.


Comments
Add Comment

'हि-मॅन'ला शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता; नवीन वर्षाची सुरुवातच होणार देशभक्तीने

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र बॉलिवूडचा हि-मॅन कायमच आपल्या

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची