
मुंबई कतरिना कैफ आणि विकी कौशल हे नवं दांपत्य आज मुंबईत दाखल झाले राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग केल्यानंतर पहिल्यांदाच ते मुंबईत आले. हे न्यूली मॅरीड कपल मुंबईत येणार हे फोटोग्राफर्सला आधीच कळालं होतं त्यामुळे सगळ्या मीडियाने तिथे आधीच गर्दी केली होती.
हे दोघे विमानतळावर येताच कॅमेराचा लखलखाट झाला. कतरिनानेदेखील हात उंच करत फोटोग्राफरर्सना छान पोझ दिली. यावेळी कतरिनाने पीच कलरचा सुंदर सलवार सूट घातला होता. हातात लाल चुडा, भांगेत कुंकू अशा नव्या नवराईच्या थाटात दिसली तर विकी क्रीम कलरच्या शर्ट पॅन्टमध्ये होता...दोघेही हातात हात घालून विमानतळावर उतरली ,,,
9 डिसेंबरला राजस्थानमध्ये अत्यंत राजेशाही थाटात या दोघांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजले....