Friday, November 15, 2024
Homeमहत्वाची बातमीभाजपच्या आगामी विजयाची नांदी - फडणवीस

भाजपच्या आगामी विजयाची नांदी – फडणवीस

नागपूर : नागपूर (Nagpur) आणि अकोला (Akola) येथील विधान परिषद निवडणुकीतल्या (MLC Election) विजयानंतर हे मोठे कम बॅक असल्याचे आणि हा निकाल भाजपच्या आगामी काळातील विजयाची नांदी असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.

विधान परिषदेच्या ६ पैकी ४ जागेवर भाजपला विजय मिळाला असून, राज्यातील जनता भाजपसोबत असल्याचे फडणवीसांनी सांगितले. चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय भविष्यातील विजयाची नांदी आहे. तसेच त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नितीन गडकरी यांचेही आभार मानले. तसेच आपण स्वत: निवडून आल्यावर जेवढा आनंद झाला नव्हता, त्याहीपेक्षा अधिक आनंद आता झाल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल यांचा या विजयाने महाविकासआघाडीला चपराख दिली असून, तीन पक्ष एकत्र आल्यावर काहीही होऊ शकतं.. हा गैरसमजही दुर केल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडीची मतं ही नागपुरमध्ये आम्हाला मिळाली असून, मत देणाऱ्यांचं आम्ही आभार मानतो, असंही ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -