ठाणे (वार्ताहर): ठाणे शहरातील काही भागात बुधवार ते गुरुवार पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या पिसे उदंचन केंद्रातील जॅकवेलमधील कचरा, गाळ काढण्यासाठी व टेमघर शुद्धीकरण केंद्रामधील तसेच शहरातील विविध ठिकाणी तातडीने देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकरीता शटडाऊन घेण्यात येणार आहे.
या शटडाऊनमुळे बुधवार दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते गुरुवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत ठाणे शहरातील इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, रामनगर, डिफेन्स, किसननगर, घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, ईटरनिटी, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, कोलशेत, आझादनगर या भागात पाणी पुरवठा बंद राहील. तसेच बुधवार रात्री ९ ते गुरुवार सकाळी ९ वाजेपर्यंत ऋतु पार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्रा परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…