Saturday, May 10, 2025

मनोरंजनरिलॅक्सताज्या घडामोडी

बिग बॉसच्या घरामध्ये साजरा होणार तृप्तीताईंचा वाढदिवस

बिग बॉसच्या घरामध्ये साजरा होणार तृप्तीताईंचा वाढदिवस
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज साजरा होणार आहे तृप्तीताईंचा वाढदिवस. ज्या निमित्ताने त्यांनी एक आयुष्यावर भाष्य करणारी सुंदर कविता घरच्या सदस्यांना ऐकवली.



आयुष्यं हे विधात्याच्या वहीतलं पानं असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पानं मृत्यू तर पहिलं पानं जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची असतात. कारण आपलंच ते कर्म असतं.... चुका जरी झाल्या तरी फाडून फेकायचं नसतं. कारण त्यातूनचं आपल्याला पुढे शिकायचं असतं. एकटे आलो म्हणून काय झालं सर्वांच होऊन जायचं असतं...



तृप्तीताईंनी इतकी समर्पक कविता सांगितल्यावर घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले.
Comments
Add Comment