जेष्ठ भाजप नेते आमदार हरबंस कपूर यांच्या निधनामुळे दु:ख : पंतप्रधान

नवी दिल्ली : उत्तराखंडचे जेष्ठ भाजप नेते व डेहराडूनच्या (Dehradun) कॅंट भागातील भाजप आमदार हरबन्स कपूर (Harbans Kapoor) यांचे निधन झाले. हरबंस कपूर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीव्र शोक व्यक्त केला आहे. (Prime Minister pays tributes to harbans kapoor)


ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "भाजप उत्तराखंडचे जेष्ठ सहकारी हरबंस कपूर जी त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले. ते एक जेष्ठ लोकप्रतिनिधी आणि प्रशासक होते. सामाजिक सेवा आणि कल्याण क्षेत्रात त्यांच्या योगदानासाठी हरबंस कपूर सदैव लक्षात राहतील. समर्थक आणि कुटुंबीयांना संवेदना. ओम शांती." असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात नमूद केले आहे.


कपूर सलग आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हरबन्स कपूर यांच्या डेहराडून येथील निवासस्थानी पोहोचून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Comments
Add Comment

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

राष्ट्रपतींनी हेलिकॉप्टर 'प्रचंड'मधून केले उड्डाण

जैसलमेर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थानमधील जैसलमेर येथून स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर