ठाणे (वार्ताहर) : ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. ठाण्यातील सावरकर नगर, म्हाडा आणि पाटीलवाडी भागात एका पिसाळलेल्या कुत्र्याने सोमवारी सुमारे १५ जणांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे.
यामध्ये ३ ते ४ लहान मुलांचा देखील समावेश आहे. या कुत्र्याला पकडण्यासाठी आरोग्य विभागाची गाडी पाचरण करण्यात आली, दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत या कुत्र्याचा शोध सुरू होता. अखेर संध्याकाळी उशिरा हा कुत्र्याला पकडण्यात ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाला यश आले.
दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असून याचा नाहक त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्यात आता सावरकर नगर भागात सोमवारी सकाळी ११.३० वाजता पासून एका पिसळलेल्या कुत्र्याने येथील नागरिकांना भयभीत करून सोडल्याचे दिसून आले. या पिसाळलेल्या कुत्र्याने कोणाच्या हाताला, कोणाच्या पायाला चावा घेऊन पळ काढला. यात तीन ते चार लहान मुलांचा देखील समावेश आहे. या भागातील सुमारे ३४ जणांना त्यांनी चावा घेतल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या कुत्र्याला अखेर सांयकाळी उशिरा या कुत्र्याला पकडण्यात यश आले. दरम्यान तब्बल ३४ जणांना चावा घेतल्यामुळे भटक्या कुर्त्यांची दहशद पुन्हा एकदा ठाणेकरांमध्ये पसरली आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…