मुंबई : “प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही चु**गिरी बंद करा”, असे वक्तव्य केल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत आता वादात सापडले असून त्यांच्याविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपा कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने राऊत यांच्याविरोधात भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे. दीप्ती यांनी ९ डिसेंबर रोजी संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, ज्यावर १२ डिसेंबर २०२१ रोजी एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना खुर्ची देण्यावरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही. ही चु**गिरी बंद करा”, असे राऊत म्हणाले होते. संजय राऊत यांच्या विधानावर भाजपाने आक्षेप घेतला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. त्याच वेळी संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीट करून चु** या शब्दाचा अर्थ सांगितला. आसाममध्ये हे आडनावच असल्याचे या व्हिडीओतून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, “मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ मूर्ख असा आहे. देशाच्या सर्व शब्दकोशांमध्ये त्याचा अर्थ दिला आहे. त्या शब्दकोशांना सरकारची मान्यता आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी त्या शब्दावर आपले मत व्यक्त केले आहे. दिल्लीत माझ्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. सूडाच्या भावनेने माझा आवाज दाबण्यासाठी हे केले आहे. सीबीआय, ईडी आतापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत कारण मी सरळ माणूस आहे. मला त्रास देण्यासाठी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी ही तक्रार करण्यात आली आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…