Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

म्हाडा परीक्षा पेपर फुटी प्रकरण : म्हाडाचा पेपर सेट करणाराच निघाला अट्टल मवाली, पुण्यात तिघांना अटक

म्हाडा परीक्षा पेपर फुटी प्रकरण : म्हाडाचा पेपर सेट करणाराच निघाला अट्टल मवाली, पुण्यात तिघांना अटक

पुणे : म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटीचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आज (दि.१२) रविवारी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन एजंट आरोपी बुलढाण्याचे तर एक जण परीक्षा घेणारा संस्थेतील पुण्यातील आरोपी आहे.


संतोष हरकळ, अंकुश हरकळ (दोघे रा.बुलढाणा), प्रितेश देशमुख (पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पेपर फुटी प्रकरणात एजंट आहे तर देशमुख म्हाडाची परीक्षा घेणाऱ्या जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा पेपर सेट करणारा अधिकारी आहे.


शनिवारी रात्री १० वाजता तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्रभर चौकशी केली. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. दुपारी शिवाजीनगर न्यायालयात त्यांना हजर केले जाणार आहे.


दरम्यान यापूर्वी पुणे सायबर पोलिसांनी आरोग्य विभागातील गट क व ड या परीक्षेचे पेपर फुटला प्रकरणी कारवाई करत, मराठवाडा मुंबई येथील वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर एजंटांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. आणि त्यातच आता म्हाडाच्या परीक्षेचा देखील पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment