साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा उच्छाद सुरु असल्याचे गंभीर वास्तव पुन्हा समोर आले आहे. राजस्थानमधील भिवाडी येथून दर्शनासाठी आलेल्या साईभक्त मंजू सचदेव यांच्या बहिणीची दोन लाख रुपयांची रक्कम असलेली पर्स चक्क साई मंदिरात चोरीला गेली असून याबाबत भाविकांनी शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.


मंजू सचदेव या आपल्या बहिणी किरण सुनिल ग्रोवर आणि पुजारी श्यामसुंदर यांच्यासोबत १९ जून २०२५ रोजी सकाळी ८.४५ वाजता साई दर्शनासाठी मंदिरात दाखल झाल्या. त्यावेळी किरण ग्रोवर यांच्या हाताशी असलेल्या काळ्या पर्समध्ये दोन लाख रुपयांची रोख रक्कम होती. दर्शनानंतर मंदिराच्या चार नंबर गेटजवळील लाडू काउंटरवर गेल्यावर पर्स उघडली असता ती रिकामी आढळली. पर्स नीट पाहिली असता, खालून ती धारदार वस्तू ने कापल्याचे आढळले.


घटनेची तक्रार साई संस्थान ऑफिसमध्ये करण्यात आली असता, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंदिरात दर्शन घेत असताना त्यांच्या पाठीमागून पाच ते सहा जण शिरत असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यात एक महिला देखील असून, तीच पर्समधून पैसे काढून खिशात टाकत असल्याचे दिसून येते. या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी