सहा हजारांपेक्षा जास्त रेल्वे स्थानक वाय-फाय युक्त

नवी दिल्ली:  देशातल्या 6071 रेल्वे स्थानकांवर आत्तापर्यंत वाय-फाय सेवा पुरविण्यात आली आहे. रेल्वे स्थानकामध्ये येणा-या प्रवाशांना त्यादिवशी पहिल्या अर्धा तासासाठी ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतरच्या काळासाठी मात्र वाय-फाय वापरासाठी शुल्क आकारले जाणार आहे.

रेल्वे स्थानकावर वाय-फाय उपलब्ध असेल तर प्रवाशांना इंटरनेटचा वापर करणे सुकर होते. यामुळे जनतेला ऑनलाइन सेवा तसेच माहिती घेण्यास मदत होते. त्याचबरोबरच यामुळे सरकारच्या डिजिटल भारत उपक्रमाला हातभार लागत आहे. या रेल्वेस्थानकांवर दरमहा अंदाजे एकूण 97.25 टेराबाइटस् इतका डेटा वापरला जात आहे.

या योजनेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आलेला नाही. तर दूरसंचार विभागाकडून ‘युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड’ (यूएसओएफ) अंतर्गत ग्रामीण भागातल्या 193 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा पुरविण्यासाठी 27.22 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मेसर्स रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (आरसीआयएल)च्या वतीने देशातल्या 1287 रेल्वे स्थानकांवर वाय-फाय सेवा पुरविण्यात येत आहे. (यापैकी बहुतांश रेल्वे स्थानके ए-1 आणि ए श्रेणीतील आहेत) उर्वरित स्थानकांमध्ये विविध कंपन्यांनी सीएसआर म्हणजे सामाजिक दायित्व म्हणून आपल्या खर्चाने वाय-फाय सेवा प्रदान केली आहे. यासाठी रेल्वेला कोणत्याही प्रकारचा भांडवली खर्च करावा लागलेला नाही.


Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन