
भंडारा : सौदी अरेबियातुन आलेला व्यक्तिच्या अहवाल कोरोना पोझिटीव्ह निघाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संबधित व्यक्तिवर भंडारा सामान्य रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. संबधित व्यक्तिची ओमिक्रोन चाचणी करून त्याचे सैंपल पूणे येथील प्रयोग शाळेत तपासणी साठी पाठविले आहे. विशेष म्हणजे संबधित व्यक्ति 6 डिसेंबरला जिल्ह्यात आला होता, परंतु त्याने स्वताच्या विदेशी प्रवासाची माहिती लपवून ठेवली होती,
मात्र भंडारा प्रशासनाला ह्याची माहिती मिळताच संबधित व्यक्तिची आर टी पिसी आर चाचणी करताच त्याचा अहवाल पोझिटीव्ह आल्याने खबरदारी म्हणून भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या निवासस्थानाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. पुणे येथील पाठविन्यात आलेल्यां चाचणी अहवाल 4 दिवसानन्तर प्राप्त झाल्यावर प्रशासन पुढील भूमिका ठरविनार आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात आता प्रयत्न 34 च्या जवळ विदेशातुन लोक आल्याची माहिती आहे. विदेशातुन आल्याची माहिती लपविल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.