सावधान ! धारावीत सापडला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण

मुंबई :   मुंबईतील धारावीत देखील आता ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.  पूर्व  आफ्रिकेतील टांझानिया येथून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.


पूर्व अफ्रिकेतील टांझानिया येथून  आलेला या व्यक्तीचा कोविड रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटीव्ह आला होता. त्याचे स्वॅब जिनोम सिक्वेंसिंगकरता कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला ओमायक्रॉनची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


या व्यक्तीला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे होते.  या व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली गेली आहे. आज धारावीतील एकाला आणि या अगोदर मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे . यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे. 





Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या