पेण : ‘पेणमधील कोळी बांधवांसाठी भविष्यात अद्ययावत असे मच्छिमार्केट उभारणार’, असा संकल्प भाजप आमदार रविशेठ पाटील यांनी नुकताच येथे व्यक्त केला. पेणमधील कोळी बांधवांसाठीच्या नियोजित मच्छिमार्केटच्या कामाचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते व नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी आमदार रविशेठ पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, सभापती दर्शन बाफणा, नगरसेविका शेहनाज मुजावर, नगरसेविका देवता साकोस्कर, नगरसेविका अश्विनी शहा, नगरसेवक अजय क्षिरसागर, कोळीवाडा पंचकमिटी अध्यक्ष आदींसह कोळी बांधव उपस्थित होते.
रविशेठ पाटील यांनी सांगितले की ‘कोळी समाज अतिशय कष्टाळू असून येथील महिला वर्ग सकाळपासून मच्छीविक्री करीत असतो. अशा या कष्टकरी समाजासाठी एक सुसज्ज मार्केट बांधण्याचा आपला प्रयत्न असून लवकरच आपण हा मानस पूर्ण करू असे म्हणाले. नवीन मार्केटसाठी जागा, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम आगामी काळात नगराध्यक्षा नक्कीच करतील. मी आपल्या सेवेसाठी नेहमी उपलब्ध असून कधीही कोणती चूक होत असेल तर आपण नक्कीच माझ्या निदर्शनास आणून द्या. ती चूक नक्कीच सुधारली जाईल. मंत्री पदाच्या काळात सातपाटी सारख्या ठिकाणी केलेल्या विकास कामांची आठवण यावेळी रविशेठ पाटील यांनी उपस्थितांना सांगितली. राजकारण न करता समाजाच्या उन्नतीसाठी सर्व कोळी बांधवानी एकत्रित राहावे, एकसंघ राहावे असे आवाहन पाटील यांनी कोळी बांधवाना केले.
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…