कतरिना कैफ आणि विकी कौशलचा शाही विवाह सोहळा संपन्न 

जोधपूर : अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा शाही विवाह सोहळा आज जोधपूर येथे संपन्न झाला. या सोहळ्याला कतरिना आणि विकीच्या काही मोजक्याच नातेवाईकांची उपस्थिती होती. या शाही विवाह सोहळ्यासाठी कतरिना कैफने भरजरी कॉश्च्यूम परिधान केले होते.



 


सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात ही रॉयल वेडिंग पार पडली. कतरिना -विकीच्या लग्नासाठी सिक्स सेन्सेस या राजमहालाच्या आवारात एक अतिशय भव्य मंडप तयार करण्यात आला.  याच मंडपात लग्नाचे सर्व विधी पार पडले.  .


 नववधू आणि वराच्या एंट्रीसाठी रथ आणि घोडाही तयार करण्यात आला होता अशी चर्चा रंगतेय. कतरिना कैफने  पारंपारिक डोलीमध्ये बसून मंडपात एंट्री घेतली. तर विकी कौशल हा घोड्यावर बसून मंडपात आला  


आज दुपारी साधारण १ वाजता फेटा बांधण्याचा विधी झाला, . यावेळी नवरदेवाला अगदी शाही थाटात फेटा बांधला गेला...यानंतर  विकी-कतरिनाने कुटुंब आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत सप्तपदी घेतल्या. . या लग्नासाठी उभारण्यात आलेला मंडप राजवाडा शैलीत बांधण्यात आला. तो अतिशय आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता.



दरम्यान विकी आणि कतरिनाचा मेहंदी सोहळा ७ डिसेंबरला पार पडला. यात भरपूर पंजाबी गाणी आणि ढोल वाजवण्यात आले. तर ८ डिसेंबरला संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतर पाहुण्यांसोबतच विकी-कतरिनानेही डान्स केला.  ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लाटफॉर्मला या रॉयल वेडिंगच्या वितरणाचे हक्क देण्यात आले आहेत. 





Comments
Add Comment

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या

नृत्य, संगीत आणि प्रकाशाचा अद्भुत त्रिवेणी संगम!

नेहमीच्या सादरीकरणापेक्षा काहीतरी नवीन आणि अविस्मरणीय अनुभव देणारा 'रिदम ऑन फायर' हा खास डान्सिकल कार्यक्रम

निवडणुकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ ओटीटीवर

मनोरंजन विश्वात ओटीटीने विशेष स्थान निर्माण केले आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सिरिजची

सलमान खानच्या हस्ते मॅजिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता जितेंद्र जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या मॅजिक या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर