Monday, July 15, 2024
Homeदेशओमायक्रॉन कमी घातक! विषाणूचा शोध लावणाऱ्या डॉक्टरचा दावा

ओमायक्रॉन कमी घातक! विषाणूचा शोध लावणाऱ्या डॉक्टरचा दावा

प्रसारवेगामुळे काळजी आवश्यक

मुंबई : कोरोनाचा ‘ओमायक्रॉन’ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट वेगाने प्रसार करीत असला, तरी तो कमी घातक असल्याचा दावा या विषाणूचा शोध लावणाऱ्या डॉक्टरने केला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील डॉक्टर अँजलिक कोएट्झी या ओमायक्रॉन विषाणूचा शोध लावणाऱ्या संशोधक गटातील प्रमुख. ओमायक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत असला, तरी सध्याची त्याची स्थिती घातक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ओमायक्रॉनबाबत आणखी दहा ते बारा दिवसांनी अधिक स्पष्ट चित्र होईल, पण सध्या तरी तो चिंताजनक नसल्याचेच दिसत आहे, असेही कोएट्झी म्हणाल्या.

सौम्य आजार आणि बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले.
कोणत्याही आजारांच्या लाटेमध्ये लहान मुले सर्वाधिक बाधित होतात. ओमायक्रॉनमुळे आत्तापर्यंत तरी लहान मुलांवर कोणताही दुष्परिणाम झाल्याचे समोर आले नाही. तरीही सर्व देशांतील केंद्रीय आरोग्य यंत्रणांनी अधिकाधिक चाचण्या करण्याचा सल्ला कोएट्झी यांनी दिला.

एकूण २३ रुग्ण

देशात मंगळवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसला तरी सोमवारी मुंबईत नोंद झालेल्या दोन रुग्णांमुळे देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या २३ झाली आहे.
मंगळवारी केंद्र सरकारने घाना आणि टांझानिया या देशांनाही ‘जोखीम देशांच्या’ यादीत स्थान दिले असून या देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणी आणि विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ६,८२२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून ५५८ दिवसांतील ही सर्वात कमी दैनंदिन रुग्णसंख्या आहे. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ९५,०१४ आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -