तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या एमआयड-17 व्ही5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली.
घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले असून स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचण आली. या हेलिकॉप्टरमधून एकूण 14 जण प्रवास होते. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांच्या पत्नी, मधुलिका रावत, ब्रिगेडिअर एल.एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी. साईतेजा आणि हवालदार सतपाल यांचा समावेश आहे.
या घटनेची चौकशी करण्याचे आदेश तसेच समिती स्थापन करण्यात आल्याचे भारतीय वायू सेनेने ट्वीटरद्वारे स्पष्ट केले आहे. ही समिती या अपघाताचा तपास करेल. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग संसदेत या घटनेची माहिती देणार आहेत. आतापर्यंत घटनास्थळी ११ मृतदेह सापडले.