दोन इंजिनचे सरकार असताना काम दुप्पट वेगाने होते : पंतप्रधान मोदी

  60

गोरखपूर (वृत्तसंस्था) : केंद्र आणि उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दोन इंजिनांसारखे आहे, त्यामुळे ते दुप्पट वेगाने विकासकामे करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरखपूरमध्ये एका उद्घाटन कार्यक्रमात केले.


शुद्ध हेतूने काम केले जाते, त्यावेळी संकटंही आपल्याला अडवू शकत नाहीत. गोरगरीब, वंचित, शोषितांची काळजी करणार सरकार असते, तेव्हा ते देखील जोमाने काम करतात. त्या सरकारला पुन्हा निवडून आणतात, असे मोदी म्हणाले. मी पाच वर्षांपूर्वी एम्स रुग्णालय आणि खतांच्या कारखान्याच्या पायाभरणी समारंभासाठी आलो होतो. या दोन्ही गोष्टींचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला आज मिळालं. आयसीएमआरच्या रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरला नवी इमारतही आज मिळाली आहे. मी उत्तर प्रदेशच्या नागरिकांचं अभिनंदन करतो, असे मोदींनी पुढे म्हटले.


उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९,६०० कोटींहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं उद्घाटन केले. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. यावेळी त्यांनी गोरखपूरमधल्या विकास प्रकल्पांच्या प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी गोरखपूर फर्टिलायझर प्लांट, एम्स गोरखपूर आणि आयसीएमआर- रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरचं उद्घाटन केले.

Comments
Add Comment

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या

पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी

नवी दिल्ली : पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या इन्स्टा अकाउंटवर भारतात बंदी लागू करण्यात आली आहे. भारत सरकारने निर्देश

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत, या दरम्यान ते ब्रिक्स शिखर

नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता