खुषखबर! रेल्वे गाडीत सीट उपलब्ध असल्यास आता संदेश मोबाईलवर येणार

मुंबई :  रेल्वे प्रवाशांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.आता तुम्हाला कन्फर्म तिकिटासाठी वेगवेगळ्या गाड्यांच्या याद्या पाहण्याची गरज नाही. तुम्ही जात असलेल्या मार्गावर जर कोणत्या गाडीत सीट उपलब्ध असेल, तर त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल. त्यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकीटच मिळेल. आयआरसीटीसीने पुशअप् नावाची नवी सुविधा सुरू केली असून, त्याअंतर्गत प्रवाशांना चार्ट तयार होण्याआधीच सीट उपलब्ध असल्याचा मेसेज मोबाईलवर पाठविला जात आहे.

आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ने ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी प्रवाशांनी पुश अप् नोटिफिकेशनसाठी आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करणे गरजेचे आहे. नोंदणी केलेल्या मोबाईलवरच सीट उपलब्ध असल्याचा मेसेज पाठविला जाईल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.
Comments
Add Comment

जगभरातील बालमृत्यूच्या घटनांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी

नवी दिल्ली : जगभरात जवळपास १० लाख मुले पाच वर्षांचे वय गाठण्याआधीच मृत्युमुखी पडली. कुपोषणाशी संबंधित घटक-जसे की

२००९ पासून अमेरिकेतून १८,८२२ भारतीय हद्दपार

मंत्री एस. जयशंकर यांची राज्यसभेत माहिती नवी दिल्ली : अमेरिकेने २००९ पासून एकूण १८,८२२ भारतीय नागरिकांना हद्दपार

अंदमान येथे होणार स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

अंदमान : अंदमान येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अजरामर गीताला

‘अयोध्या बस झाँकी है, काशी-मथुरा बाकी है’: योगी आदित्यनाथ

सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज चालणार नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (८

गोव्यातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव! २५ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री प्रमोद सांवतांनी दिले चौकशीचे आदेश

अर्पोरा: गोव्यातील अर्पोरा गावातील एका नाईट क्लबमध्ये मध्यरात्री एकच्या सुमारास भीषण आग लागली. बर्च बाय रोमियो

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला