मुंबई : रेल्वे प्रवाशांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.आता तुम्हाला कन्फर्म तिकिटासाठी वेगवेगळ्या गाड्यांच्या याद्या पाहण्याची गरज नाही. तुम्ही जात असलेल्या मार्गावर जर कोणत्या गाडीत सीट उपलब्ध असेल, तर त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल. त्यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकीटच मिळेल. आयआरसीटीसीने पुशअप् नावाची नवी सुविधा सुरू केली असून, त्याअंतर्गत प्रवाशांना चार्ट तयार होण्याआधीच सीट उपलब्ध असल्याचा मेसेज मोबाईलवर पाठविला जात आहे.
आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ने ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध केली आहे. यासाठी प्रवाशांनी पुश अप् नोटिफिकेशनसाठी आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करणे गरजेचे आहे. नोंदणी केलेल्या मोबाईलवरच सीट उपलब्ध असल्याचा मेसेज पाठविला जाईल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.