लवकरच येत आहे प्लानेट स्त्री, महिलांसाठी स्वतंत्र ओटीटी

मुंबई : 'प्लानेट मराठी'चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी 'प्लानेट स्त्री' हा महिलांसाठी स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करत आहेत. या प्लॅटफॉर्मवर फक्त महिलांसाठी म्हणून विशेष कंटेंट असेल. महिलांनी, महिलांनी आणि महिलांसाठी तयार केलेला ओटीटी प्लॅटफॉर्म असे 'प्लानेट स्त्री'चे स्वरुप असेल. प्रतिष्ठीत महिलांच्या उपस्थितीत या ओटीटी प्लॅटफॉर्मचे लाँचिंग होणार आहे.



महिलांनी महिलांसाठी तयार केलेले पॉडकास्ट, महिलांसाठी वेबफिल्म, महिलांच्या जीवनावर केंद्रीत लघुपट आणि माहितीपट, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ महिलांकडून संबंधित क्षेत्राविषयी मार्गदर्शन किंवा टिप्स देणारे अनेक व्हिडीओ पण या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. ग्रामीण महिला आणि महिला शेतकऱ्यांच्या योगदानावर प्रकाश टाकणारे तसेच महिला उद्योजिकांविषयीचे व्हिडीओ पण या प्लॅटफॉर्मवर बघता येतील. ज्ञात आणि अज्ञात अशा अनेक महिला कलाकारांना या मंचाद्वारे एकत्र आणण्याचा प्रयत्न केल जाईल. लवकरच हा ओटीटी प्लॅटफॉर्म अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. 'प्लानेट स्त्री' लोकप्रिय झाल्यास भविष्यात या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन गेमिंग आणि ऑनलाईन शॉपिंग हे पर्याय उपलब्ध होणार आहेत.
Comments
Add Comment

Toxic Movie : रिव्ह्यू देणं पडलं महाग! 'टॉक्सिक'वर नकारात्मक बोलणाऱ्या युट्यूबरची अडचण वाढली; निर्मात्यांच्या एका निर्णयाने सिनेसृष्टीत खळबळ

मुंबई :  कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतीक्षित ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट प्रदर्शित

Amaal Mallik : अमाल मलिकचा चित्रपट संगीताला तात्पुरता विराम; म्हणाला, ‘आता माझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणार’

मुंबई : संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सध्यापुरता चित्रपटांसाठी नवीन संगीत देण्यापासून दूर राहण्याचा निर्णय

Yash's 'Toxic' hits box office : यशच्या 'टॉक्सिक' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 100 कोटींचा टप्पा पार

मुंबई : कन्नड सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक : ए फेयरीटेल फॉर ग्रोन-अप्स' ने रिलीज झाल्यानंतर

Shweta Tiwari : श्वेता तिवारी प्रकरणात मोठा ट्विस्ट; ट्रोलर मनसेचा सदस्य नसल्याचं उघड

मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीने ऑनलाइन महिलांविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या काही सोशल

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

मुंबई : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. GIVAच्या या

Kuku Kohli : बॉलिवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांना अखेरचा निरोप

मुंबई : ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली (Kuku Kohli) यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत