ओबीसींचे राजकीय अस्तित्त्व संपवण्याचा कट- आ. प्रवीण दटके

नागपूर : राज्य मागासवर्ग आयोगाची आर्थिक कोंडी करून ओबीसी आरक्षणास कायमचा सुरुंग लावण्याचा आणि त्याद्वारे ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे उघड झाल्याची टीका भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी उमेदवारांसाठीच्या आरक्षणाच्या गंभीर मुद्द्यावर जाणीवपूर्वक चालढकल करणाऱ्या राज्य सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या 27 टक्के जागांवर निवडणूक घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ओबीसींचे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी या समाजाचे राजकीय मागासलेपण सिद्ध करणे आवश्यक होते. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगास ठाकरे सरकारने निधी व अन्य कोणत्याही प्रकारचे सहकार्य न केल्याने आयोगाचे कामकाजच सुरू झाले नाही. काँग्रेसच्या व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच न्यायालयाने निर्धारित करून दिलेली प्रक्रिया जाणीवपूर्वक लांबवून आरक्षण मिळूच नये यासाठीच सरकारने आयोगाची कोंडी केली, असा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील ओबीसी समाजाची माहिती गोळा करून त्यांच्या राजकीय मागासलेपणाचा अभ्यास व त्यानुसार अहवाल सादर करण्यासाठी 435 कोटी रुपयांचा प्रस्ताव आयोगाने जुलैमध्येच राज्य सरकारला पाठविला होता, पण सरकारने त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याने आरक्षणासंदर्भात आवश्यक माहिती गोळा करण्याचे कामच सुरू झाले नाही. राज्य सरकारने आदेश दिल्यास एक महिन्याच्या आत हा अहवाल देण्याची तयारी असल्याचे आयोगाने गेल्या ऑगस्टमध्येच स्पष्ट केले होते. मात्र सरकारने त्यावरही काहीच कार्यवाही न केल्याने आरक्षण गमावण्याची वेळ ओबीसी समाजावर आल्याचे दटके यांनी सांगितले.

गेल्या ऑगस्टमध्ये या प्रश्नासंदर्भात ठाकरे सरकारने बैठक बोलावली, तेव्हाही सरकारकडे कोणताच प्रस्ताव किंवा तोडगा नव्हता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या बैठकीतच सुचविल्याप्रमाणे, मागासवर्गीय आयोगामार्फत इम्पिरिकल डेटा तयार करून ओबीसींचा राजकीय मागासलेपणा सिद्ध करणे आवश्यक होते. मात्र ही तिहेरी प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी दिरंगाई करून तीन पक्षांच्या सरकारने तिहेरी फसवणूक केली आहे.

राज्यातील महत्वाचे राजकीय व सामाजिक प्रश्न टांगणीवर ठेवून समाजामध्ये अस्वस्थता माजविण्याचा राज्य सरकारचा कट आहे, असा थेट आरोप आमदार दटके यांनी केला. आयोगाची कोंडी करून अध्यादेशाद्वारे आरक्षण लागू करण्याचा निर्णय न्यायालयात टिकणार नाही याची जाणीव असतानाही, आरक्षण मिळू नये या भूमिकेतूनच सरकारने तिहेरी फसवणुकीचा कट आखण्यात आला. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करून त्यांचे राजकीय हक्क त्यांना पुन्हा मिळावेत यासाठी भाजप संघर्ष करेल, असा इशारा दटके यांनी यावेळी दिला.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी