महेंद्रसिंह धोनी नव्या अवतारात

नवी दिल्ली : प्रो-कबड्डी लीगच्या (पीकेएल) नव्या हंगामाचा प्रोमो रिलीज करण्यात आला असून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी नव्या अवतारात दिसत आहे. अधिकृत प्रसारण भागीदार स्टार स्पोर्ट्सने प्रो-कबड्डी लीगच्या या हंगामाचा प्रोमो नुकताच जारी केला.
प्रो-कबड्डीच्या प्रोमोमध्ये धोनी हा एका खास अवतारात दिसत आहे. प्रोमोची थीम ‘तू ले पंगा है’ आहे, तर त्याचे घोषवाक्य ‘भिडेगा तो बढेगा’ आहे. या एका मिनिटाच्या प्रोमोमध्ये धोनी दिसला आहे. संपूर्ण प्रोमोमध्ये धोनीला लोकांसाठी प्रेरणेचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.



प्रो-कबड्डी लीग दोन वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. यावेळचा हंगाम आठवा आहे. या निमित्ताने कबड्डीचा थरार पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर येणार आहे. प्रो-कबड्डी लीगचा हा मोसम २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. सध्या या लीगची तयारी जोरात सुरू आहे, जिथे देश आणि जगातील अनेक युवा आणि दिग्गज कबड्डीपटू आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज आहेत.



प्रो-कबड्डीच्या आठव्या हंगामातील सर्व सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील. तसेच, सर्व लीग सामने एकाच ठिकाणी खेळवले जातील, बायो बबलमध्ये राहणाऱ्या लीग सदस्यांच्या संपर्कात बाहेरील कोणीही येऊ शकणार नाही.



धोनी सध्या कबड्डीला प्रोत्साहन देत असला, तरी पुढील वर्षी तो क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. आगामी आयपीएलमध्ये तो पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. त्याला नुकतेच चेन्नई सुपर किंग्जने १२ कोटी रुपयांना रिटेन्शन प्रक्रियेत कायम ठेवले आहे.

Comments
Add Comment

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या

बडोद्यात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध 'विराट' विजय

बडोदा : भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली.

टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर अखेर शुभमनचे मौन सुटले

बडोदरा : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल

जेमिमाला दिलेलं वचन सुनील गावस्कर यांनी पाळलं

मुंबई : भारतीय क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांनी दिलेले एक खास वचन अखेर पूर्ण झाले आहे. भारतीय संघाने विश्वचषक