Thursday, April 24, 2025
Homeअध्यात्मजिथे कमी तिथे स्वामी

जिथे कमी तिथे स्वामी

विलास खानोलकर

अक्कलकोटी उभा औदुंबर ।
प्रेम करे त्यावर सारे चराचर ।। १।।
मनात येता तुझीच भक्ती ।
अंगात येई हत्तीची शक्ती ।। २।।
अजान बाहू तू खरा ईश्वर ।
दाखविल्या तव लीला आरपार ।। ३।।
तुझे अस्तित्व मूर्ख न जाणे ।
तुझ्या कृपेचे गूढ ते जाणे ।। ४।।
तुझ्याच अभक्तांचे देणे-घेणे।
नाम घेता हरसी दुःख तेणे ।। ५।।
असा तू अक्कलकोटीचा देव ।
जणू कैलासाचा प्रसन्न देव ।। ६।।
तुझे नाम घेता प्रसन्न गणेश ।
खूश होती सारे ईश ।। ७।।
तुझी भक्ती हीच शक्ती ।
दुबळ्याला मिळे बहुत शक्ती ।। ८।।
तू सर्व देवांचा महादेव ।
वंदनकरिती सारे देव ।। ९।।
कुणीकरिती कुटिल निती ।
तव द्रव्याचा लोभ दाविती ।। १०।।
मिथ्या भक्तीचा आव आणिती ।
कृपा न मिळे बिलकूल प्राप्ती।। ११।।
मनापासूनी तुला जे पुजती ।
त्यांना न भय कधी ना भीती ।। १२।।
पुण्य मार्ग तेच जाती ।
जे दिनरात स्वामी महती गाती ।। १३।।

।। स्वामी समर्थ महाराज की जय ।।

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेली भूमी म्हणजे अक्कलकोट. अक्कलकोट हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आहे. ते एक पवित्र प्रसिद्ध असे यात्रा स्थळ बनले आहे. दसरा, दिवाळी, देवदिवाळी, गुढीपाढवा, गुरुपौर्णिमा व नववर्ष दिन तसेच दर मंगळवार, गुरुवार व रविवार भक्तांची प्रचंड गर्दी होत असते.

शासनाकडून अक्कलकोट स्वामींचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. स्वामी समर्थ मंदिरामध्ये आजसुद्धा भक्तांना स्वामी साक्षात दर्शन देत आहेत, असे भास होत असतात. ज्या गोष्टी शंभर वर्षांपूर्वी स्वामी असताना घडल्या आहेत, असे वाटत असते, ते आताच्या वर्तमानकाळातही पुन्हा घडत आहे, असे भक्तांना भास होत असतात. त्यामुळे भक्तांचा दृढविश्वास वाढतो, स्वामींवरची भक्ती वाढते व स्वामीच त्यांना यश देतात. सर्व संकटामध्ये तो निर्विघ्नपणे पार पडतो.

श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य संदेश ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ या एकाच वाक्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा आपलेपणाचा भाव भक्तांच्या मनामध्ये ठासून बसतो. जिथे-तिथे, जळी, स्थळी, कष्टी, पाषाणी स्वामी समर्थांचा दिव्य सहवास आपल्याबरोबर आहे, याची प्रचिती येते. श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्र उच्चारांमध्ये प्रचंड दैवी शक्तीचा वास असल्याची प्रचिती भक्तांना येते. म्हणून आज संपूर्ण भारतात स्वामी भक्तीचा महिमा पसरत असल्याचे दिसून येते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -