पुणे: परदेशातून आलेल्या नागरिकांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र याचा पूर्ण खर्च नागरिकांना करावा लागणार आहे.याच बरोबर पालिका कोविड केअर सेंटर मध्ये देखील या नागरिकांनाची क्वारंटाइन व्यवस्था करत आहे.
परदेशांतून आलेल्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाइन करायचे आहे. त्यांना महापालिकेच्या ‘सीसीसी’मध्ये रहायचे नसेल, तर त्यांना हॉटेलमध्ये राहता येणार आहे. त्याची सोय महापालिकेने केली आहे, मात्र याठिकाणी रहायचे असेल तर संबंधित प्रवाशाला स्वत: हा खर्च उचलावा लागणार आहे. करोना काळातही अशीच सोय करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आताही सोय करण्यात आली आहे.
करोनाचे रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर महापालिकेने सर्व ‘सीसीसी’ बंद केले. परंतु बाणेर आणि नायडू हे सुरू ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी अद्यापही काही रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. मात्र याशिवाय येरवडा येथील संत ज्ञानेश्वर येथील, हडपसर येथील आणि अन्य काही ठिकाणचे ‘सीसीसी’ एका दिवसात सुरू करण्याची तयारी महापालिकेची आहे.