चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच : छगन भुजबळ

  77

नाशिक (प्रतिनिधी) :चित्रकला आणि शिल्पकला हे देखील साहित्यच आहे. त्यामुळे त्याचा देखील आम्ही सन्मान करतो, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात "ऐसी अक्षरे" या कार्यक्रमात ते बोलत होते.



अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अच्युत पालव यांचे कॅलिग्राफी प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भेट देऊन छगन भुजबळ यांनी अच्युत पालव व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.



यावेळी छगन भुजबळ म्हणाले आपल्या साहित्य संमेलनाचा परीघ ह्या वर्षी आपण वाढवला आहे. त्यात बालकवी कट्टा, चित्रकला, कॅलिग्राफी , शिल्पकला प्रदर्शनाचा कार्यक्रम देखील घेतला आहे. साहित्य आणि चित्रकलाही आपल्याला नेहमी विचार करायला भाग पाडतात आणि साहित्य, चित्रकलेतून मनात अनेक तरंग उठतात.
अच्युत पालव म्हणाले की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चित्रकलेला आदरपूर्वक सन्मान दिला याचा आनंद होत आहे.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला