चेन्नई त्रि-साप्ताहिक एक्स्प्रेसच्या फेऱ्यांत वाढ

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेने २२१५७/२२१५८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - चेन्नई एग्मोर त्रि-साप्ताहिक एक्स्प्रेसची फेऱ्यांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. १२ डिसेंबर २०२१ पासून आणि चेन्नील एग्मोर येथून दि. १५ डिसेंबर २०२१ पासून वाढवून दैनिक करण्याचा निर्णय घेतला आहे.



या ट्रेनचे थांबे, वेळ आणि संरचनेत कोणताही बदल झालेला नाही. ट्रेन क्र. २२१५७ च्या वाढलेल्या वारंवारतेसाठी बुकिंग दि. ५ डिसेंबर २०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आरक्षण सुरू होईल. ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे, एसओपींचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे