मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभा शुक्रवारी वादळी झाली. नायर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ भाजपच्या ११ आरोग्य समिती सदस्यांनी राजीनामा राजीनामा दिला आहे. सभागृहात या राजीनाम्याबद्दलच्या उल्लेखावरून भाजप आणि शिवसेना नगरसेवक भिडले. तर भाजप नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना घेराव घातला.
नायर रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाच्या निषेध करत भाजपच्या ११ आरोग्य समिती सदस्यांनी राजीनामा दिला आहे. सभागृहात या राजीनाम्याबद्दल उल्लेख केल्याने भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये बाचाबाची सुरू झाली. हळूहळू सभागृहातील वातावरण तापले. त्यानंतर भाजप नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्षांना घेराव घातला. तर दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे १५ मिनिटांकरता सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
दरम्यान सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे नायर रुग्णालयातील रुग्णावर झालेल्या दिरंगाईबाबत सभागृहाचे लक्ष वेधून या घटनेचा तीव्र निषेध केला. तर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याला पाठिंबा देत या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करतानाच भाजपलाही टोला लगावला होता. यामध्ये त्यांनी काही लोक आरोग्य समितीच्या सदस्यत्वाचे राजीनामे देत या प्रकरणाचा शोध घेण्याऐवजी पळ काढतात असे ते म्हणाले.
त्यामुळे भाजप नगरसेवक चिडले. त्यातून भाजप व शिवसेना नगरसेवक आमनेसामने आले. तर स्थायी समिती अध्यक्षांनाही त्यांनी घेराव घातला. दरम्यान सभागृहात गोंधळ झाला व सभागृह देखील बंद पाडले.
दरम्यान याबाबत शिवसेनेची भूमिका बेताल असून गंभीर विषयावर चर्चा असताना यशवंत जाधव यांनी राजकारण केले व भाजपच्या नगरसेवकांनी रुग्णालयाला दिलेली भेट त्यांना झोंबली. तसेच आरोग्य समितीच्या सदस्यांनी दिलेले राजीनामे त्यांना झोंबले. त्यामुळे त्या रुग्णालयात भाजपचे कुणी फिरकले नसल्याचा त्यांनी दावा केला आहे आणि त्यामुळेच भाजपचे नगरसेवक त्यांना घेराव घालण्यास गेले आणि त्यांचा निषेध करण्यासाठी सभागृह बंद पाडले असे भाजप स्थायी समिती सदस्यांनी सांगितले.
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतून (Marathi) दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश…
मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख…
मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन…
महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन…