महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे ८ उपनगरी विशेष गाड्या

  75

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६ डिसेंबर (५/६ डिसेंबर २०२१ च्या मध्यरात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरीता ८ उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.



मेन लाईनवर अप विशेष कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विशेष कल्याण येथून रात्री ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री २.३० वाजता पोहोचेल. कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून रात्री ०२.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ०३.४५ वाजता पोहोचेल.



मेन लाईनवर डाउन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०१.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे रात्री ०३.०० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०२.३० वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे ०४.०० वाजता पोहोचेल.



हार्बर लाइनवर अप विशेष पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री ०१.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री ०२.३५ वाजता पोहोचेल. पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून रात्री ०२.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ०३.५० वाजता पोहोचेल.



हार्बर लाइनवर डाउन विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०१.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे रात्री ०३.०० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ०२.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे ०४.०० वाजता पोहोचेल.

Comments
Add Comment

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक