नवी दिल्ली: आगामी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये भारतीय संघ तीन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि चार टी-२० सामने खेळणार आहे. मात्र हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण ओमायक्रॉनचा फटका भारतीय क्रिकेटलाही बसला आहे. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव पाहता भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा किमान एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आला आहे.
मीडिया वृत्तानुसार सध्या भारतीय क्रिकेट नियमन मंडळ म्हणजेच बीसीसीआय क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करत आहेत. यात ओमायक्रॉनमुळे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय संघ नियोजित वेळापत्रकानुसार ९ डिसेंबर रोजी चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. मात्र सध्या या नियोजित वेळपत्रकातील कार्यक्रम आणि डिपार्चर स्थगित करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलीय.
या दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये बदल झाल्यामुळे संघामध्येही बदल होणार असल्याचं बोललं जात आहे.
याआधीही कोरोनामुळे भारतीय क्रिकेट संघाचा दौरा रद्द करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमधील शेवटचा सामना खेळण्यास नकार दिला होता. संघातील काही जणांना कोरोना संसर्ग झाल्याने संघाने शेवटची कसोटी खेळण्यास नकार दिला होता.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…