Monday, March 17, 2025
Homeदेशउद्योजक बनण्याचे केंद्रीय मंत्री राणे यांचे आवाहन

उद्योजक बनण्याचे केंद्रीय मंत्री राणे यांचे आवाहन

सेवा क्षेत्रासाठी विशेष पत आधारित भांडवल अनुदान योजना सुरू

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनण्यासाठी उद्योजक बना, असे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे केले आहे. सेवा क्षेत्रासाठी विशेष पत आधारित भांडवल अनुदान योजनेची गुवाहाटीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ईशान्य परिषद झाली. यावेळी ईशान्येकडील अनुसूचित जाती/जमाती उद्योजकांचा सत्कार करतानाच सेवा क्षेत्रासाठी विशेष पत आधारित भांडवल अनुदान योजना सुरू केल्याची घोषणा केली.

तरुणांच्या यशस्वी उद्योजक होण्याच्या प्रवासात एमएसएमई मंत्रालय कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही देतानाच एमएसएमई क्षेत्राची सर्वसमावेशक वाढ केवळ ईशान्येकडील योगदानानेच पूर्ण होते यावर राणे यांनी भर दिला. केंद्र सरकारची अनुकूल धोरणे आणि एमएसएमई मंत्रालयाद्वारे, विशेषत: समाजातील उपेक्षित घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना/कार्यक्रम या क्षेत्राला तिची पूर्ण क्षमता ओळखण्यास मदत करत आहेत, असे राणे यानी पुढे सांगितले.

सेवा क्षेत्रासाठी विशेष पत आधारित भांडवल अनुदान योजना क्षेत्रातील उद्योगांच्या तंत्रज्ञानाशी संबंधित गरजा पूर्ण करण्यात मदत करेल. एससी-एसटी एमएसएमईला संस्थात्मक कर्जाद्वारे प्रकल्प, यंत्रसामुग्री आणि सेवा उपकरणे खरेदी करण्यासाठी २५ टक्केभांडवली अनुदानाची यात तरतूद आहे. तंत्रज्ञान अद्ययावत करतानाकोणतेही विशिष्ट क्षेत्रासंबंधी निर्बंधही टाकलेले नाहीत.

एमएसएमई मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित प्रदर्शन केंद्रातील एससी-एसटी उद्योजकांच्या स्टॉलला केंद्रीयमंत्र्यांनी भेट दिली. अशा उपक्रमांमुळे एमएसएमई उद्योजकांना, विशेषत: महिला आणि अनुसूचित जाती/जमाती उद्योजकांना त्यांचे कौशल्य/उत्पादने दाखवण्याची आणि विकासासाठी संधी निर्माण करण्याची संधी मिळते असे नारायण राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -