१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

दुबई (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत ग्रुप बीमध्ये असून या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडाचा समावेश आहे. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान सुरू होणारी ही स्पर्धा २३ दिवसांची असेल.


वेस्ट इंडिजमधील चार शहरांत ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यात १६ संघ सहभागी होणार आहेत. एकूण ४८ सामने होतील. गतविजेते बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा आणि युएईला ग्रुप एमध्ये स्थान देण्यात आले आहे, तर ग्रुप सीमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा समावेश आहे. ग्रुप डीमध्ये वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि स्कॉटलंड याचा समावेश आहे.


सक्तीच्या क्वारंटाइन नियमांमुळे न्यूझीलंडने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्पर्धेचे आयोजन एंटीगा आणि बारबुडा, ग्याना, सेंट किट्स आणि नेविस, त्रिनिदाद आणि टोबॅगो हे करणार आहेत.


प्रत्येक ग्रुपमधून दोन संघ सुपर लीग स्पर्धेत पोहोचतील. सेमीफायनल १ आणि २ फेब्रुवारी रोजी, तर फायनल ५ फेब्रुवारी रोजी सर व्हिव्हिएन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे.


भारतीय संघाला ग्रुप फेरीत किमान दोन सामने जिंकावे लागतील. असे झाले तरच भारत पुढील फेरीत प्रवेश करेल. गेल्या स्पर्धेत भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता, पण बांगलादेशकडून भारताचा पराभव झाला होता. यावेळी भारताला नवा कर्णधार मिळाला असून संघाला विजेतेपदाची आशा आहे.

Comments
Add Comment

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

महिला एकदिवसीय क्रमवारीत लॉरा वुल्फार्ट अव्वल

स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर घसरली; जेमिमाची 'टॉप १०' मध्ये दमदार एन्ट्री मुंबई : नुकताच महिला वनडे वर्ल्ड कप

वर्ल्डकप जिंकल्यावर हरमनप्रीतने सोशल मीडियातून दिला 'हा' संदेश

नवी मुंबई : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आणि भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला.

जगज्जेत्या टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना आवडतो 'हा' पदार्थ

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ वर भारतानं नाव कोरलं. ही किमया साधण्यासाठी टीम इंडियाला प्रेरित करणे आणि

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा

ICC Worldcup 2025 : भारताच्या लेकींनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिला 'हा' सर्वात मोठा संदेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय