सागवे विभागातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
राजापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी राजापूर तालुका दौऱ्यावर आलेले भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी सागवे विभागात शिवसेना आणि काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. या विभागातील या दोन्ही पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करत निलेश राणे यांनी या विभागात पक्ष संघटन अधिक बळकट करा, मी तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली.
गुरूवारी मिठगवाणे येथील श्री देव अंजनेश्वर यात्रोत्सव कार्यक्रम व अणसुरे पंचायत समितीतील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी निलेश राणे राजापूर तालुका दौऱ्यावर आले होते. या प्रसंगी जानशी येथील साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या विभागातील शेकडो शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला.
या प्रसंगी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, भाजपाचे ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मेढेकर, भाजपा महिला आघाडीच्या नेत्या उल्का विश्वासराव, भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष मुकुंद जोशी, दोनिवडेचे माजी सरपंच दीपक बेंद्रे, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष जब्बार काझी, तालुका उपाध्यक्ष राजा काजवे, साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा शीतल चव्हाण, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, राजन कुवेसकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी सागवे विभागातील सचिन वेतकर, ओंकार वेतकर, दिगंबर वेतकर, महेश बारसकर, संदीप बारसकर, आनंद बारसकर, संतोष साखरकर, देविदास पंगेरकर, सुरेंद्र मयेकर, हर्षद शिरवडकर, प्रथमेश शिरवडकर, परेश बारस्कर, समीर कणेरी, जितू जाधव, गणेश पवार, सिताराम पवार, परेश आडविलकर, सचिन गोसावी, निखिल गुरव, अनिकेत गुरव, संदीप पांचाळ, प्रकाश पुजारी, सुभाष गुरव, दीपक नेवरेकर, सुर्या गुरव, योगेश तांबे, दिनेश मोंडे, सचिन गुरव आदींसह अनेक सेना, काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
राजा काजवे व पंढरीनाथ आंबेरकर यांच्या पक्ष संघटना वाढीसाठी सुरू असलेल्या धडपडीचे निलेश राणे यांनी विशेष कौतुक केले.