मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल असलेले व गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाचे (एसप्लानेड) न्यायाधीश भाजीपाले यांनी हा निर्णय दिला.
परमबीर यांच्याबरोबरच रियाज भाटी आणि विनय सिंह यांनाही फरार घोषित करण्यात आलं आहे. पोलीस आयुक्त पद भूषवलेल्या एका अधिकाऱ्याला न्यायालयानं फरार घोषित करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. अँटिलिया स्फोटकांच्या प्रकरणात काही पोलिसांचाच सहभाग असल्याचेआढळल्यानंतर परमबीर सिंग यांची मुंबईच्या आयुक्तपदावरून बदली केली. त्यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. देशमुख यांनी पोलिसांना १०० कोटींच्या खंडणीचं टार्गेट दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. गोरेगाव खंडणी प्रकरणात वारंवार समन्स बजावूनही हजर होत नसल्यानं मुंबई पालिसांच्या गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी परमबीर व अन्य तिघांना फरार घोषित करून पुढील कार्यवाही करण्याची विनंती अर्जाद्वारे केली होती. त्यावरील सुनावणीअंती न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी हा निर्णय जाहीर केला.
फरार घोषित करण्यात आल्यामुळं परमबीर सिंगांच्या अडचणी वाढणार आहेत. आता मराठी, हिंदी व इंग्रजी वर्तमानपत्रात न्यायालयाच्या आदेशाची प्रसिद्धी करून ३० दिवसांची मुदत दिली जाईल. तरीही हे तिघे न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मिळण्यासाठी गुन्हे शाखेतर्फे न्यायालयात अर्ज दिला जाईल. त्यानंतर त्यावरील सुनावणीअंती न्यायालयाने अनुमती दिल्यानंतर परमबीर सिंग व अन्य दोन्ही आरोपींची संपत्ती जप्त करण्याची कायदेशीर कारवाई गुन्हे शाखेचे अधिकारी करतील.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…